Connect with us

Uncategorized

फडणवीसांनी उशीरा का होईना मदत केली, आभारी आहे: रोहित पवार

Published

on

केंद्राकडील प्रलंबित निधी आणि लसीचे पुरेसे डोस मिळण्यासाठीही त्यांचं असंच सहकार्य मिळेल, ही अपेक्षा | Rohit Pawar Devendra Fadnavis

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णंसख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महाविकासआघाडी सरकारने लादलेले निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनला भाजपने पाठिंबा दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यामध्ये रोहित पवार यांनी, तुम्ही उशीरा का होईना पण मदत केलीत, यासाठी आभारी असल्याचे म्हटले आहे. (Rohit Pawar welcome move of BJP leader Devendra Fadnavis supporting Lockdown)

 

 

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकार्य मिळाल्याचं पाहून बरं वाटलं. केंद्राकडील प्रलंबित निधी आणि लसीचे पुरेसे डोस मिळण्यासाठीही त्यांचं असंच सहकार्य मिळेल, ही अपेक्षा, असा चिमटाही रोहित पवार यांनी काढला. याशिवाय, राज्यात हातावर पोट असलेल्यांसाठी एखादी योजना आणण्याची गरजही रोहित पवार यांनी बोलून दाखविली.

 

महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन

महाराष्ट्रात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल) लॉकडाऊन करण्यात येईल. तर आजपासून (5 एप्रिल) दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू राहील. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे, मात्र त्याविषयी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. वीकेंड लॉकडाऊनच्या वेळी ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये जाऊन पार्सल नेता येणार नाही, मात्र होम डिलीव्हरीचा पर्याय उपलब्ध असेल.

Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending