Connect with us

Uncategorized

Uddhav Thackeray: ‘शिवरायांच्या भाषेला ‘अभिजात’ दर्जा कसा मिळत नाही पाहूच’

Published

on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी बाणा जपण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. (Uddhav Thackeray Wishesh On Marathi Language Day)

मुंबई: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम मराठी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मी मराठी, माझी मराठी’ हा बाणा जपू या!, असं आवाहन त्यांनी केलं. ‘एका ध्येयाने एक होऊन पुढं जाऊ या, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही ते पाहूच! पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारच,’ असा जबरदस्त विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. (Uddhav Thackeray Wishesh On

Marathi Language Day)

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा दिनाचा शुभेच्छा संदेश दिला आहे. ‘अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी भाषा हा अभिमान मिरविण्यासाठी ‘मी मराठी, माझी मराठी!’ असा बाणा जपायला हवा. त्यासाठी मराठीत विचार करण्याची, मराठीत बोलण्याची आणि व्यक्त होण्याची गरज आहे. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवायला हवा. मराठीतील लेखन-वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचा स्वीकार करायला हवा. मुलांमध्ये, तरुणांमध्ये मराठीची ओढ वाढावी, तिची गोडी लागावी यासाठी कलाविष्कार, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत करायला हवे. नव तंत्रज्ञान, नव माध्यमात, समाज माध्यमातही मराठीचा आवर्जून वापर व्हायला हवा,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

‘मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेलली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझी मातृभूमी, माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय असून हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही हे पाहूच,’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Advertisement
1 Comment

1 Comment

  1. Pingback: “जोपर्यंत देवेंद्र फडणवीस ठरवतील, तोपर्यंतच ठाकरे सरकार चालेल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending